जीवन...आई...वडील...आजी... आजोबा... भाऊ... बहीण .... मित्र... मैत्रीण... शिक्षक ............... आयुष्य... मित्रांनो, आपण हे शब्द रोज ऐकतो, बोलतो किंवा ऐकवतो. किती महत्वाचे आहेत नव्हे हे शब्द आपल्यासाठी. अगदी आयुष्यभर पुरणारे आहेत. मग त्यात काही गोष्टी चांगल्या घडो अथवा वाईट पण नेहमीच हव्याहव्याश्या वाटतात. जेव्हा आपण या सुंदर अशा जगात आलो तेव्हा यातले काहीच शब्द माहिती होते जसे, आई, वडिल, आजी, आजोबा. पुढे जसे जसे समाजाशी आपला संवाद होत गेला तसा फक्त शब्दसंग्रह च वाढला नाही तर तितकेच विचार घट्ट होत गेले. अर्धात, आपले इवलेशे रोपटे केव्हा झाड झाले कळलेच नाही ......
जसे म्हणतात ना सुख आणि दुःख आयुष्यात महत्वाचे असतात तसेच 'स्वप्न' ही महत्त्वाचे असतात... आता तर स्वप्नही खूप भारी झालेली आहेत. विनोद नाही तर अगदीच आता कोणी इंजिनिअर, डॉक्टर, अधिकारी, शिक्षक असे स्वप्न पाहत नाही तर त्याहीपलिकडे 'आकाशाला ही लाजवेल' असे स्वप्न पाहतात. आणि यात चुकीचं असं काही नाहीये कारण जग आता आधुनिक, तांत्रिक दृष्टीने रेस लावल्यासारखे पुढे चाललेय यात नवल वाटण्यासारखे काहीच नाहीये. परुंतु वावगं आहे ते म्हणजे स्वप्न तर या जगातला प्रत्येक जीव पहात असतो आणि स्वप्न पूर्ण त्याचीच होतात जो स्वप्न फक्त पाहत नाही तर ते जगतो, हे समजून घेणे.
आणि स्वप्न फक्त पाहायचे नसतात तर ते जगायचे असतात. आता तुम्ही म्हणाल स्वप्न जगायचे म्हणजे काय तर रोज रात्री झोपताना ते अगदी ब्लॅक अँड व्हाईट मूवी पासून सुरुवात करून आजच्या मॉडर्न रंगेबेरंगी मूवी सारखे डोळ्यासमोर उभे करायचे नव्हे तर आपला प्रत्येक दिवस ते स्वप्न पूर्ण करण्यामागील एक पाऊल आहे या पद्धतीने जगायचं. आता हे तपासून कसे पाहणार तर आपल्या स्वप्नात असलेलं आपलं उद्दीष्ट आज आपण जे काही केले त्याला सुसंगत होते का ? हा प्रश्न आपल्या मनाला विचारून. बस्स्स्स्स एकदा की हे असे सुंदर जीवन आपल्या स्वप्नाच्या वाटेने जगायला शिकले की मग फत्ते आपलीच !
सध्याची स्वप्न म्हणजे अरे अधिकारीच व्हायचंय ना मग आयएएस, आयपीएस का नाही, इंजिनिअर व्हायचंय ना मग एक उत्त्कृष्ट बिझनेसमॅन का नाही, डॉक्टर व्हायचंय ना मग एक स्पेसिऍलिस्ट का नाही, शिक्षक व्हायचंय ना मग एक प्रोफेसर का नाही ? आणि या दृष्टीने आपण आपले भविष्य अधिकाधिक सुंदर बनवू शकू, समाजातील दुर्बल घटकांना अधिक सक्षम बनविण्यासाठी हातभार लावू शकू.
मित्रानो, असेच स्वप्न मी आठवीत असताना पहिले होते 'आयएएस' अधिकारी व्हायचं. कदाचित त्यावेळी दृष्टिकोन थोडा वेगळा होता कारण तेव्हा जे कानावर येत होते ते काहीशे वेगळे होते जसे, लाल दिव्याची गाडी, एका जिल्ह्याचा बॉस वगैरे वगैरे. असो, पण जेव्हा मला प्रश्न पडायचे ठीक आहे अधिकारी व्हायचेय ना पण हा करतो काय, त्याची कामे कोणती, तो जिल्हा बॉस असतो म्हणजे नेमके काय, त्याच्या जबाबदाऱ्या काय, त्याच्याकडे सत्ता येते म्हणजे नेमके सत्ता काय असते, असे भरपूर प्रश्न जे कदाचित त्यावेळी खूप मजेशीर, बालिश ही असतील; पण सांगण्याचे उद्दिष्ट काय तर जेव्हा आपण स्वप्न पाहतो तेव्हा हे प्रश्न म्हणजे त्यासोबत फ्री मिळालेलं गिफ्ट असतं ! जसं गिफ्ट मिळाल्यावर जो आनंद होतो ना तसाच आनंद या प्रश्नांची उत्तरं शोधताना होतो कारण हे प्रश्नच आपलयाला आपल्या स्वप्नापर्यंत घेऊन जाण्याचा अत्यंत सोपा मार्ग असतात. त्यामुळे या प्रश्नांना न घाबरता तोंड द्यायला पाहिजे जेणेकरून एक आत्मविश्वास येतो की 'आता बघचं मी आकाशावर कशी भरारी घेतो ते' !
तर मग मी या प्रश्नांची उत्तरे दहावीनंतर मोबाईल मिळाल्यावर इंटरनेट च्या साहाय्याने शोधली. कळाले की समाजासाठी काहीतरी करणे, समाजातील लोकांचे प्रश्न सोडवणे, सरकार चालवायला शासनाला मदत करणे असे बरेच काही ....... मग काय सोनेपे सुहागा ! आधीच आजोबा 'आण्णा' मुळे समाजासकडे बघण्याचा दृष्टिकोन काही निराळाच होता (आण्णा गरिब लोकांचे प्रश्न सोडवत, गावातील लोकांना मदत करत, गावाच्या विकासासाठी प्रयत्न करत ) जसे, गरजू लोकांची सेवा करणे, त्यांचे प्रश्न काय असतील त्याबद्दल उगीचच चित्रविचित्र तर्क लावणे, शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मुघलांनी केलेले रयतेचे शोषण, एखादा मूवी पाहताना पडणारे प्रश्न असे बरेच काही होते. त्यावेळी आपण यशाच्या शिखराच्या पहिल्या पायरीवर आहोत याचा भास झाला आणि याने बरेच काही साध्य झाल्यासारखे वाटले. येथूनच स्वप्नाच्या दृष्टीने पाऊल उचलले. पुढे १२वी नंतर इंजिनीरिंग केले. इंजिनीरिंग करण्यामागील उद्दीष्ट म्हणजे एक तर कष्ट करण्याची सवय लागावी आणि दुसरे म्हणजे काहीतरी स्ट्रॉंग बॅकग्राउंड असावे....... आता स्वप्न पूर्ण करण्याची वाटचाल चालू आहे.
मला माहितीये जरा जास्तच झाले नाही पण काय आहे मला लिहायची व वाचायची खूप आवड आहे, आणि त्यात मराठी म्हटलं तर मग काय आवडीचा पदार्थ मिळाल्यागत अवस्था होते (कदाचित तुमच्यातल्या काहींना नसेल तर थोडे रटाळवाणे वाटेल ) ही देणगी सुद्धा आण्णांचीच आहे. शेवटी एवढेच म्हणतात ना , आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते जगता आले पाहिजे म्हणून स्वप्न पहा पण ती फक्त पाहू नका तर त्या स्वप्नांसोबत जगायला शिका !

No comments:
Post a Comment